महात्मा गांधी जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा. 15

Admin

महात्मा गांधी जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा २

२ ऑक्टोबर हा महात्मा गांधींचा जन्मदिवस हा भारतात गांधी जयंती म्हणून आणि जगभरात आंतरराष्ट्रीय अहिंसा दिवस म्हणून साजरा केला जातो. या दिवशी भारतात राष्ट्रीय सुट्टी असते.

महात्मा गांधी जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा २

 दरवर्षी २ ऑक्टोबर रोजी गांधी जयंती साजरी केली जाते. त्यांचा जन्मदिवस म्हणून देशात आणि जगभरात हा दिवस साजरा केला जातो. ब्रिटिशांच्या राजवटीविरुद्ध भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात सहभागी झालेल्या प्रसिद्ध नेत्यांपैकी एक म्हणून त्यांना ओळखले जाते. त्यांना ‘महात्मा गांधी’ म्हणून संबोधले जाते. लोक प्रेमाने त्यांना ‘बापू’ असेही म्हणतात. तसेच गांधीजींना ‘राष्ट्रपिता’ मानले जाते. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यामध्ये त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. सामाजिक आणि राजकीय परिवर्तनासाठी अहिंसा, सविनय कायदेभंग व सत्य हे तत्त्व सामर्थ्यवान साधने म्हणून वापरणाऱ्या गांधीजींना श्रद्धांजली देण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.

गांधीजी यांचे जीवन (Life of Gandhiji)

महात्मा गांधी जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा २

महात्मा गांधीजींचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी आहे. त्यांचा जन्म २ ऑक्टोबर १८६९ रोजी गुजरातमधील पोरबंदर येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव करमचंद गांधी आणि आईचे नाव पुतळीबाई होते. वडील करमचंद गांधी हे पानसारी जातीचे होते. त्यावेळी ते पोरबंदरचे दिवाण म्हणजेच प्रधान होते. वयाच्या १३ व्या वर्षी गांधींचा विवाह कस्तुरबा गांधींशी झाला. त्यावेळी कस्तुरबा गांधी १४ वर्षांच्या होत्या. त्याच वेळी १८८७ मध्ये त्यांनी मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण केली.

पुढच्या वर्षी १८८८ मध्ये त्यांनी भावनगरच्या श्यामल दास कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. येथूनच त्यांनी पदवी शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी लंडनला जाऊन बॅरिस्टर म्हणून शिक्षण पूर्ण केले आणि नंतर दक्षिण आफ्रिकेत सराव केला; जिथे त्यांना वांशिक भेदभावाचा सामना करावा लागला. दक्षिण आफ्रिकेत आलेल्या अनुभवामुळे गांधीजींनी सामाजिक न्यायाच्या समर्पणाला चालना दिली. १९१५ मध्ये गांधीजी दक्षिण आफ्रिकेतून भारतात परतले. त्यानंतर त्यांनी स्वातंत्र्यलढ्यात सक्रिय सहभाग घेतला.

महात्मा गांधींनी हाच मार्ग अवलंबून इंग्रजांचा सामना करून देश स्वतंत्र केला. गांधीजी अनेक चळवळींचे नेतेही झाले. असहकार आंदोलन, सत्याग्रह, दांडी यात्रा आणि भारत छोडो आंदोलन, गांधीजींच्या या सर्व आंदोलनांनी भारतातील ब्रिटिश राजवटीचा पाया हादरला. गांधीजी समाजात पसरलेल्या वाईट गोष्टींच्या विरोधात होते. ते दारू, जातिवाद, विषमता, अस्पृश्यता आणि स्त्रियांवरील अत्याचारांच्या विरोधात होते. दलितांची स्थिती सुधारण्यासाठी त्यांनी खूप कार्य केले. वाईट प्रथांविरुद्ध त्यांनी आवाज उठवला.

महात्मा गांधी जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा २

गांधीजींमध्ये लोकांचे नेतृत्व करण्याची अप्रतिम क्षमता होती. त्यांचे विचार दोन पिढ्यांना प्रेरणा देणारे होते. लोक त्यांच्या विचारांच्या प्रभावाखाली आले आणि स्वातंत्र्यलढ्याचा भाग बनले. स्वातंत्र्य चळवळीला नवी दिशा देण्याचे कामही त्यांनी केले. गांधीजींच्या अहिंसेच्या तत्त्वापुढे सारे जग झुकले. त्यामुळे आज २ ऑक्टोबर हा दिवस जगभरात आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन म्हणून साजरा केला जातो. महान स्वातंत्र्यसेनानी आणि नेते महात्मा गांधी यांच्या विचार आणि कार्यामुळे २ ऑक्टोबर हा स्वातंत्र्यदिन आणि प्रजासत्ताक दिनासारखा राष्ट्रीय सण म्हणून साजरा केला जातो.

भारतीय स्वातंत्र्यात गांधीजींची भूमिका

महात्मा गांधी जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा २
  • २० व्या शतकाच्या सुरुवातीला भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील एक प्रमुख नेता म्हणून महात्मा गांधी यांचा उदय झाला. जनसामान्यांना एकत्रित करण्याची आणि विविध गटांना एका समान कारणाखाली एकत्र करण्याची क्षमता महात्मा गांधी यांच्यात होती.
  • १९२० मधील असहकार चळवळ, १९३० मधील ‘सविनय कायदेभंग चळवळ आणि १९४२ मधील ‘भारत छोडो चळवळ’ यासह अनेक मोहिमा त्यांनी ब्रिटिश राजवटीचा विरोध करण्यासाठी सुरु केल्या.
  • मिठाचा सत्याग्रह-​गांधींच्या सविनय कायदेभंगाच्या चळवळीतील ‘सॉल्ट मार्च’ ज्याला ‘दांडी यात्रा’ म्हणूनही ओळखले जाते. १९३० मध्ये महात्मा गांधींनी २४० मैल चालून ब्रिटिश मीठ कराराचा निषेध नोंदवला. यामुळे त्यांनी वसाहती कायद्यांच्या अन्यायावर प्रकाश टाकला. एवढेच नाही तर स्वातंत्र्याच्या लढ्याकडे एक पाऊल टाकून त्यांनी भारतीयांना बळ दिले होते. मिठाच्या सत्याग्रहाची सुरुवात दांडी यात्रेने झाली. ही दांडी यात्रा (मोर्चा) साबरमती आश्रमापासून १२ मार्च १९३० रोजी सुरू झाली. गांधीजींच्या बरोबर त्यांचे ७८ निवडक अनुयायी होते. त्यात सरोजिनी नायडू, इला भट यांचा समावेश होता. यात्रा पुढे निघाली, तसतशी सहभागी लोकांची गर्दी वाढतच गेली. ही यात्रा २४ दिवस चालली आणि तिच्यातील लोक ३८५ कि.मी. पर्यंत पायी चालले. यात्रा दांडी येथे समुद्रकिनारी ६ एप्रिल १९३०ला पोहोचली. त्या दिवशी जेव्हा सकाळी साडे सहा वाजता गांधीजींनी चिमूटभर मीठ उचलून कायदेभंग केला, तेव्हा कायदेभंगाच्या मोठ्या प्रमाणावरील चळवळीची ती सुरुवातच ठरली.

सामाजिक सुधारणांचे प्रवर्तक : महात्मा गांधी

महात्मा गांधी जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा २
  • महात्मा गांधींचा असा विश्वास होता की सामाजिक सुधारणा ही राजकीय स्वातंत्र्याइतकीच महत्त्वाची आहे. त्यांनी जातिव्यवस्थेविरुद्ध, विशेषत: अस्पृश्यतेच्या प्रथेविरुद्ध लढा दिला. त्यांच्या या लढ्यामुळे समाजातील उपेक्षित वर्ग समाजाच्या मुख्य प्रवाहात आला होता. तसेच त्यांनी महिलांच्या हक्कांसाठी आवाज उठवला आणि स्वातंत्र्य चळवळीतील त्यांच्या सहभागाला प्रोत्साहन दिले.
  • बापूंचे आत्मनिर्भरतेचे तत्वज्ञान-

‘स्वदेशी’ हे तत्व महात्मा गांधींच्या तत्वज्ञानाचा आणखी एक महत्त्वाचा भाग आहे. त्यांनी भारतीयांना ब्रिटिश वस्तूंवर बहिष्कार टाकण्याचे आणि आर्थिक स्वावलंबनाचे साधन म्हणून स्थानिक उद्योगांना, विशेषत: हाताने कताई आणि विणकाम यांना प्रोत्साहन देण्याचे आवाहन केले. खादीची (हात-कातलेल्या कापडाची) चळवळ ब्रिटिशांच्या आर्थिक शोषणाविरुद्धच्या आवाज उठवण्याचे प्रतीक आहे.

Leave a Comment