रतन टाटा यांनी वयाच्या ८६ व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. बुधवारी रात्री मुंबईच्या ब्रिच कँडी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. काही दिवसांपूर्वी त्यांनी आजारपणामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. बुधवारी रात्रीच त्यांचे पार्थिव रुग्णालयातून घरी आणण्यात आले. त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी मुंबईतील नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट्स हॉलमध्ये ठेवण्यात येणार आहे.
अनमोल रत्न’ हरपलं
रतन टाटांचं पार्थिव सकाळी 10 ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत नरीमन पॅाईट NCPA सभागृहात अंत्यदर्शनासाठी ठेवलं जाणार
अंत्ययात्रा संध्याकाळी 4 वाजता नरीमन पॅाईटमधील NCPA इथून निघणार
मरीन ड्राईव्ह, गिरगाव चौपाटी, पेडर रोड, हाजी अली, वरळी जेट्टी, वरळी नाका, नेहरू विज्ञान केंद्र आणि माता रमाई आंबेडकर हिंदू स्मशानभूमी
वरळीतील स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
रतन टाटांना मिळालेले पुरस्कार
पद्मभूषण
पद्मविभूषण
महाराष्ट्राचा पहिला उद्योगरत्न पुरस्कार
ऑनररी नाईट कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एम्पायर
ऑनररी नाईट ग्रँड क्रॉस ऑफ द ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एम्पायर
ग्रँड ऑफिसर ऑफ द ऑर्डर ऑफ मेरिट ऑफ इटालियन रिपब्लिक
फ्रान्स सरकारचा कमांडर ऑफ द लीजन ऑफ द ऑनर
ऑस्ट्रेलियाचा ‘ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया’ सर्वोच्च पुरस्कार
नॅनो’ कारची कल्पना कशी डोक्यात आली
मुंबईतल्या रस्त्यावरुन बाईकवर एक कुटुंब जात होतं. गाडीवर चार जण होते. वरुन पाऊस सुरु होता. त्याच रस्त्यावरुन जाणाऱ्या रतन टाटांनी ते दृश्य बघितलं. त्यानंतर त्यांच्या डोक्यात विचार आला की, सर्वसामान्य कुटुंबाकडे अडीअडचणीला बाईकशिवाय पर्याय नसतो. कारण चारचाकी घेण्याची आर्थिक क्षमता त्यांच्यात नसते. त्याचदिवशी टाटांनी ठरवलं की, अशा अनेक सामान्य कुटुंबांना त्यांच्या खिशाला परवडेल अशी गाडी बनवूयात. याच विचारातून ‘टाटा नॅनो’चा जन्म झाला. आशियातली सर्वात स्वस्त गाडी बाजारपेठेत आली. पहिले अगदी काही दिवस गाडीची देशासहीत जगभर चर्चा झाली. माध्यमांनी कार लाँचिंगचं थेट प्रक्षेपण केलं. नंतर काही दिवसांनी कुठेतरी ‘टाटा नॅनो’ कार पेटल्याची बातमी आली. काहींकडून त्या बातम्या अजून मसाला लाऊन पसरवल्या गेल्या. कारण त्यावेळी किमान ५ लाखात गाड्या विकणाऱ्या काही इंटरनॅशनल कंपन्यांना १ लाखाची गाडी बघून पोटात गोळा उठला असावा.
रतन टाटा यांची उपलब्धी
- २००० साली टाटा ग्रुपने युके आणि कॅनडा मधली सर्वात मोठी चहा कंपनी टेटली ग्रुप विकत घेतला. टेटली विकत घेतल्यामुळे टाटा ग्रुपची टाटा कन्स्युमर प्रोडक्ट ही कंपनी जगातली दुसरी सर्वात मोठी चहा उत्पादन करणारी कंपनी झाली.
- २००१ साली इन्शुरन्स क्षेत्रातल्या अमेरिकेतल्या अमेरिकन इंटरनॅशनल ग्रुप म्हणजेच ए.आय.जी. या कंपनीची ७४ टक्के हिस्सेदारी टाटा ग्रुपने खरेदी केली. कंपनीचे नाव झाले टाटा एआयजी जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड.
- मार्च २००४ मध्ये दक्षिण कोरियातली डेबू कमर्शियल वेहिकल कंपनी टाटांनी १०२ मिलियन डॉलर्सला खरेदी केली. कंपनीचे नविन नाव टाटा डेबू कमर्शियल व्हेईकल कंपनी असे ठेवण्यात आले.
- २००४ साली टाटा कन्सल्टन्सी सर्विसेस म्हणजेच टी.सी.एस या आयटी कंपनीची शेअर बाजारात लिस्टिंग झाली. आज टी.सी.एस भारतातली दुसरी सर्वात मोठी टेक कंपनी आहे. जगातल्या ४६ देशांमध्ये १४९ ठिकाणी या कंपनीची ऑफिसेस आहेत. सर्विस सेक्टर हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे. आणि यात टाटा कन्सल्टन्सी सर्विसेसचे सर्वात मोठे योगदान आहे.
- जुलै २००५ मध्ये कॅनडातली टेलिग्राम इंटरनॅशनल होल्डिंग ही कंपनी टाटा ग्रुपने २३९ मिलियन डॉलर्सला खरेदी केली. कंपनीचे नवीन नाव टाटा इंटरनॅशनल कॅनडा असं ठेवण्यात आले.
- जानेवारी २००७ मध्ये युके मधला कोरस ग्रुप तब्बल १२ बिलियन डॉलर्सला टाटा ग्रुपने विकत घेतला, टाटा स्टील युरोप लिमिटेड असं कंपनीचं नाव ठेवण्यात आलं.
विकत घेतल्या जॅग्वार कार्स, लँड रोवर
1999 मध्ये, टाटा समूहाला आपला नवीन कार व्यवसाय फोर्डला विकायचा होता. रतन टाटा त्यांच्या टीमसह डेट्रॉईटला गेले आणि फोर्डचे चेअरमन बिल फोर्ड यांची भेट घेतली. तीन तास चाललेल्या या बैठकीत रतन टाटा यांना अपमानास्पद वागणूक देण्यात आली. बिल यांनी त्यांना स्पष्टपणे सांगितले होते की त्यांना कारबद्दल काहीच माहिती नाही आणि फोर्ड त्याच्या कार डिव्हिजन विकत घेऊन टाटांवर उपकार करत आहे.
त्या बैठकीनंतर, रतन टाटा यांनी कार विभाग न विकण्याचा निर्णय घेतला आणि ते भारतात परतले. त्यांनी आपले सर्व लक्ष टाटा मोटर्सवर केंद्रित केले आणि आणखी मेहनत घेतली. ते म्हणतात, अपयश ही सर्वात मोठी प्रेरणा आहे.
नऊ वर्षांनंतर टेबल उलटले आणि रतन टाटा यांनी त्यांचा क्षण पकडला. 1999 मध्ये अमेरिकेत झालेल्या अपमानानंतर, टाटांनी फोर्डवर त्याचा बदला घेतला. त्यांनी फोर्ड कंपनीची jaguar विकत घेतली.
फोर्डचे चेअरमन बिल फोर्ड यांनी रतन टाटा यांचे आभार मानले, “तुम्ही जेएलआर खरेदी करून आमच्यावर मोठा उपकार करत आहात.” टाटांनी केवळ JLR खरेदीच केले नाही तर ते त्यांच्या सर्वात यशस्वी उपक्रमांपैकी एक बनले.