बांधकाम कामगारांसाठी सरकारकडून राबविण्यात येणाऱ्या योजनेसंबंधी मोठा निर्णय घेण्यात आला आहे. अटल बांधकाम कामगार आवास योजनेतंर्गत स्वत:ची जागा नसलेल्या कामगारांना जागा खरेदीसाठी 1 लाख रुपये अर्थसहाय्य केले जाणार आहे.
अंतर्गत नोंदणीकृत बांधकाम कामगारास त्याचे हक्काचे घर बांधण्यासाठी किंवा घराचे नवीनीकरण/दुरुस्तीसाठी 2 लाख रुपयांपर्यंत आर्थिक सहाय्य करण्यात येते.

इमारत बांधकाम क्षेत्रात काम करणारे कामगार किंवा इतर क्षेत्रात काम करणारे कामगार हे आर्थिक दृष्ट्या गरीब असतात त्यांना राहायला स्वतःचे घर नसते तसेच कामाच्या मोबदल्यात मिळणारे वेतन हे कमी असल्यामुळे ते स्वतःचे पक्के घर बांधण्यासाठी असमर्थ असतात त्यामुळे ते कच्च्या पडक्या घरात राहतात त्यामुळे त्यांना ऊन, वारा, पाऊस, थंडी यांचा सामना करावा लागतो. त्यामुळे कामगारांच्या या सर्व समस्यांचा विचार करून कामगार मंडळाने कामगारांच्या कल्याणासाठी
अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गासाठी प्रधानमंत्री सूर्यघर योजनेंतर्गत सौर विद्युत संच
उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी जिल्हा नियोजनच्या निधीतून अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गासाठी प्रधानमंत्री सूर्यघर योजनेंतर्गत सौर विद्युत संच देण्याच्या सूचना दिल्या. ते म्हणाले की, जिल्हा नियोजनमधील अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गासाठी राखीव निधीतून रस्ते, नाले, प्रकाश व्यवस्था ही कामे करण्यात येतात. मात्र या कामांची आता पुर्नरावृत्ती होत आहे. त्याऐवजी पात्र लाभार्थ्यांना प्रधानमंत्री सौरघर योजनेंतर्गत सौर विद्युत संच दिल्यास वीज देयकातून या लाभार्थ्यांची कायमची सुटका होईल. तसेच अनुसूचित जाती योजनांसाठी असलेल्या जिल्हा नियोजन निधीतून जिल्हा परिषद व राज्यस्तरीय यंत्रणांना काम करण्याची परवानगी देण्यात यावी. आदिवासी क्षेत्रातील शेतकऱ्यांना सौर पंपासह विंधन विहिरी घेण्यासाठी परवानगी देण्यात यावी, असेही उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.
अटल बांधकाम कामगार आवास योजना ची पात्रता
अटल बांधकाम कामगार आवास योजना ची पात्रता खालीलप्रमाणे असेल.

अटल बांधकाम कामगार आवास योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित बांधकाम कामगार हा महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदणी असलेला पाहिजे. तसेच तो सक्रीय बांधकाम कामगार असणे देखील तितकेच महत्वाचे आहे.
अश्या बांधकाम कामगाराने अटल बांधकाम कामगार आवास योजना ( ग्रामीण ) चा लाभ घेऊन घराचे बांधकाम पूर्ण करून घर बांधणीच्या पूर्णत्वाचा दाखला सादर केला आहे असे बांधकाम कामगार महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडून अर्थसहाय्य प्राप्त करण्यासाठी पात्र राहतील.
अटल बांधकाम कामगार आवास योजनेंतर्गत पात्र ठरलेल्या बांधकाम कामगारांनी एकूण २६९ चौ .फुट.इतके क्षेत्र असलेले घर बांधकाम करणे आवश्यक आहे. या घर साठी योजनेंतर्गत त्या लाभार्थ्याला १.५ लाख इतके अनुदान मंडळाकडून अनुदान स्वरुपात देण्यात येईल. परंतु जर लाभार्थ्याला या पेक्षा जास्त जागेत बांधकाम करायचे असेल आणि त्या करीता जास्त खर्च येणार असेल तर तसे करण्यास लाभार्थ्याला मुभा आहे परंतु हा खर्च त्याला करावा लागेल या साठी कुठलेही अनुदान मिळणार नाही.
अटल बांधकाम कामगार आवास योजना साठी लाभार्थी पात्रता काय असेल
अटल बांधकाम कामगार आवास योजना अंतर्गत अनुदानाचा लाभ घेण्यासाठी पात्रता निकष खालिलप्रकारे असतील.
- अटल बांधकाम कामगार आवास योजना चा लाभ घेऊन घरकुल बांधकामासाठी अनुदान मिळण्यासाठी अर्जदार हा महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळा चा नोंदणीकृत सक्रीय सदस्य असावा. तसेच अर्ज करतेवेळी तो अर्जदार हा मंडळाकडे कमीतकमी एक वर्षापासून नोंदणीकृत बांधकाम कामगार असणे गरजेचे आहे.
- अर्जदाराचे किंवा त्याच्या पत्नीचे किंवा पतीचे महाराष्ट्र राज्यात इतर कुठेही घर नसावे तसेच अश्या आशयाचे घोषणापत्र त्या अर्जदाराला सदर करणे गरजेचे आहे जर तसे आढळले तर अर्जदाराचा अर्ज रद्द करण्यात येईल.
- नोंदणीकृत बांधकाम कामगारास पक्के घर बांधण्यासाठी त्याच्या किंवा त्याच्या पती किंवा पत्नीच्या नावाची जमीन असणे गरजेचे आहे किंवा त्या जमिनीवर जर कच्चे घर असेल तर त्या ठिकाणी तो पक्के घर बंधू शकतो.
- अश्या नोंदणीकृत बांधकाम कामगाराने इतर कुठ्ल्याहि घरकुल योजनेचा लाभ घेतलेला नसावा , तसे स्वय्घोषित घोषणापत्र सदर करणे घरजेचे असेल.
- एकदा या योजनेचा लाभ घेतल्यानंतर अर्जदार पुन्हा या योजनेचा लाभ घेऊ शकणार नाही.
अटल बांधकाम कामगार आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- प्रधानमंत्री आवास योजनेत पात्र असल्याबाबत सक्षम अधिकाऱ्याचे पत्र/प्रमाणित यादी
- पॅन कार्ड
- रहिवाशी दाखला
- 90 दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र
- कायमचा पत्ता पुरावा
- ई-मेल आयडी
- मोबाईल नंबर
- काम करत असलेल्या बांधकामाचा पत्ता
- नोंदणी अर्ज
- पासपोर्ट आकारातील 3 फोटो
- बँक पासबुक झेरॉक्स
- जन्माचा दाखला (शाळा सोडल्याचा दाखला)
- नियोक्त्याचे मागील वर्षभरात 90 दिवस किंवा दिवसापेक्षा जास्त दिवस काम केल्याच्या दाखला (इंजिनिअर/ठेकेदार)
- महानगर पालिकाकडून बांधकाम कामगार असल्याचे प्रमाणपत्र
- ग्रामपंचायतकडून ग्रामसेवकाकडून बांधकाम कामगार असल्याचे प्रमाणपत्र
- घोषणापत्र
अटल बांधकाम कामगार आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत अटी व शर्ती

- अर्जदार कामगार हा महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवाशी असणे आवश्यक आहे.
- अर्जदार कामगार हा महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदणीकृत व योजनेंतर्गत पात्र असावा.
- कामगारांचे महाराष्ट्रातील वास्तव्य 15 वर्ष असावे.
- तो नोंदीत कामगार असावा व नोंदणी चालू असावी.
- कामगारांचे वय 18 वर्ष ते 60 वर्ष दरम्यान असावे.
- सदनिका प्राप्त झाल्यापासून पुढील 5 वर्षापर्यंत कोणत्याही प्रकारे बांधकाम कामगारास सदनिका हस्तांतरीत करता येणार नाही.
- महाराष्ट्र बांधकाम कामगार आवास योजनेंर्तगत लाभास पात्र असणारा गृहनिर्माण प्रकल्प महारेरा अधिनियम, 2016 अंतर्गत नोंदणीकृत असावा.
- महाराष्ट्र राज्याच्या बाहेरील बांधकाम क्षेत्रातील कामगारास या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
- मंडळाकडे नोंदणी जिवीत असलेले पात्र बांधकाम कामगार या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र राहतील.
- बांधकाम कामगार राज्य किंवा केंद्र शासनाद्वारे सुरु एखाद्या इतर योजनेचा लाभ घेत असता कामा नये.
- योजनेअंतर्गत लाभार्थी म्हणुन निवडलेला बांधकाम कामगार हा महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडील 2 लक्ष अनुदानास पात्र आहे. मात्र सदर अनुदान संचालक, राज्य अभियान संचालनालय यांच्या अधिनस्त असलेल्या राज्य अभियान संचालनालयाकडे जमा करण्यात येईल.
- अर्जदाराने मागील 12 महिन्यांमध्ये 90 दिवसांपेक्षा जास्त दिवस बांधकाम कामगार म्हणून काम केलेले असणे आवश्यक आहे.
- तो नोंदीत कामगार असावा व नोंदणी चालू असावी.